जळगाव मनापातील ‘तो’ अधिकारी अखेर निलंबित; आयुक्तांनी काढले आदेश
जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२४ । बांधकाम परवानगीसाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्या महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील मनोज वन्नेरेलावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय,. याबाबतचे आदेश महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी काढले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अहवाल प्राप्त होताच ही कारवाई करण्यात आली. नगररचना विभागात पिंप्राळा शिवाराची जबाबदारी असलेले रचना सहायक मनोज वन्नेरे यांना ९ डिसेंबर रोजी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. महापालिका आयुक्त व नगररचना विभागाचे सहायक संचालकांसाठी पैसे घेतल्याचे तक्रारीत म्हटले होते. दरम्यान, वन्नेरेला अटक करण्यात आली होती.
त्यात १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा बुधवारी अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी वन्नेरे याच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.