⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

भुसावळला ‘द बर्निंग बाईक’चा थरार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२४ । शहराजवळ तापी पुलाच्या मिस्तरी कामासाठी आलेल्या गोजोऱ्याच्या युवकाच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेत सुदैवाने कोणासही इजा झाली नाही.

योगेश अशोक सोनवणे हा तरुण तापीनगरात कामाला जात असताना यावल रोडवरील गोदामाजवळ गाडीतून धूर निघू लागल्याने त्याने वाहन थांबवले व धुराची पाहणी करीत असताना दुचाकीने पेट घेतला. हे पाहून या तरुणाने रस्त्याच्या कडेला धाव घेतली, तर दुचाकीने पेट घेतल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. शहर पोलिस ठाण्याचे हवालदार सुपडू पाटील व संजय ढाकणे यांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पालिकेच्या अग्निशमन केंदाच्या बंबाला पाचारण करण्यात आले व आग नियंत्रणात आणली.