जळगावत अपघाताची मालिका सुरूच; फुपनगरी फाट्याजवळ भीषण अपघातात दोघे मित्र ठार

डिसेंबर 19, 2024 10:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२४ । जळगाव शहरातील अजिंठा चौक परिसरात घडलेल्या दोन अपघातांनंतर, आज गुरुवार, 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास फुपनगरी फाट्याजवळ आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आलीय. ज्यामध्ये दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा ताबा सुटला आणि त्याने समोर येणाऱ्या डंबरला जोराची धडक दिली. या दुर्घटनेत दोन तरुण जागीच ठार झाले.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

पंकज शंकर कोळी (वय-२६) आणि कृष्णा उर्फ अमोल आनंदा कोळी (वय-२७, दोन्ही रा. घार्डी ता. जळगाव) असे मयत तरुणांचे नाव असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम उशिराने सुरु होते. अपघातातील मृत दोन्हीही सेंट्रिंग काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. हे दोघे मित्र कामावरून दुचाकी क्रमांक (एमएच १९ एव्ही ३४४६)ने घरी घार्डी येथे जात असताना जळगाव तालुक्यातील फुपनगरी फाट्याजवळ ताबा सुटल्याने भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या डंपरला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात घडला.

या भीषण अपघातात दुचाकीवरील पंकज आणि अमोल या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. तसेच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now