धरणगाव तालुक्यात एसटीला भीषण अपघात; 28 प्रवासी जखमी

डिसेंबर 14, 2024 11:08 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२४ । धरणगाव तालुक्यात एसटीला भीषण अपघात झाला आहे. चालकाचा भरधाव बसवरील ताबा सुटल्याने बस थेट वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांद्यावर धडकल्याने बसमधील 28 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ जवळील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटना दोनगाव गावाजवळील स्मशानभूमीनजीक घडली.

bus accidnet dharangaon

याबाबत असे की, धरणगाव तालुक्यातील लाडली गावात मुक्कामी असलेली बस नेहमीप्रमाणे लाडली येथून सकाळी शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन निघाली. यादरम्यान दोन गावाजवळील स्मशानभूमीच्या वळणाजवळ येताच भरधाव बसवरील चालक अशोक जगन्नाथ पाटील यांचा बसवरील ताबा सुटल्याने वळणावरील जवळील इलेक्ट्रिक खांब्याला बस धडकली. त्यानंतर, बस थेट नाल्यात गेली असती पण सुदैवाने इलेक्ट्रिक खांब्याला धडकल्याने पुढील दुर्घटना टळली आहे. या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोनगाव लाडली, दोनगाव आणि रेल गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने बसमधून उतरवत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now