जळगावात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

डिसेंबर 12, 2024 7:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२४ । जळगावात अपघाताचे सत्र कमी होताना दिसत नसून अशातच भरधाव डंपरने पुढे जाणाऱ्या दुचाकीला उडवल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी जळगाव शहरातील आरएल चौफुलीनजीक घडली. आसिफ हाजी शौकत कुरेशी (वय 40 रा. आशा नगर, सुप्रीम कॉलनी जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

accident jpg webp

या घटनेबाबत असे की, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेले आसिफ कुरेशी हा तरुण आपल्या पत्नी व चार मुलांसह जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील आशानगर येथे वास्तव्याला होते. वॉल फिटिंगचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. बुधवारी 11 डिसेंबर रोजी दुपारी ते गावात दुचाकी क्रमांक (एमएच 19 डीसी 1751) ने गेलेले होते. जळगाव शहरातील काम आटपून ते दुपारी 3.30 वाजता घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एमआयडीसीतील आर. एल. चौफुली येथून जात असताना त्याच्या मागून येणारे डम्पर क्रमांक (एमएच 19 सीएक्स 4940) ने मागून जोरदार धडक दिली.

आसिफ कुरेशी यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रवाना करण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now