जळगावात थंडीने गारठले, किमान तापमान ९ अंशाखाली घसरले

डिसेंबर 12, 2024 7:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२४ । गेल्या आठवड्यात फेंगल चक्रीवादळामुळे जळगावसह राज्यातील थंडी गायब झाली होती. मात्र आता उत्तरेकडून थंड येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमाल आणि किमान तापमानात घट होत असून जळगाव शहरासह परिसरातील किमान तापमान चांगलेच घसरले आहे. सोमवारी ते ८.६ अंशांवर होते. त्यामुळे शहर चांगलेच गारठले आहे.

thandi jpg webp

दरम्यान, किमान तापमान मंगळवार व बुधवार असे दोन दिवस आणखी घसरू शकते, अशी माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली. फेंगल चक्रीवादळामुळे थंडीचा जोर कमी झाला होता. त्यामुळे शहरातील किमान तापमान हे १८ अंशांवर पोहोचले होते; परंतु आता पुन्हा उत्तर भारतातील थंड वाऱ्यांमुळे शहरातील गारठा वाढला आहे. सकाळी ६ ते ८ या दरम्यान प्रचंड थंडी जाणवत असून, सोमवारी किमान तापमान ८.६ अंश तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे.

येत्या १५ तारेखपर्यंत किमान तापमान हे ८ ते ९ अंश दरम्यान असणार आहे. या काळात चांगलीच हुडहुडी जाणवणार आहे. दरम्यान, किमान तापमान ४ डिसेंबरला १८.८ अंशांवर होते. सहा दिवसांत ते १० अंशांनी खाली आले आहे. पुढील दोन दिवसांत ते आणखी खाली येण्याचा अंदाज आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now