१५ हजाराची लाच घेताना जळगाव महानगरपालिकेचा अधिकारी जाळ्यात

डिसेंबर 12, 2024 7:31 PM

जळगाव लाईव्ह न्यू । जळगाव महानगरपालिकेचा अधिकारी लाच घेताना जाळ्यात अडकला आहे. बांधकाम परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महापालिकेतील नगररचना विभागाचा नगररचना सहायक मनोज समाधान वन्नेरे (३४, रा. जळगाव) याला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

lach manapa

याबाबत असे की, खेडी बुद्रुक येथील तक्रारदाराने महानगरपालिकेत एकूण तीन प्रकरणे मंजुरीसाठी दिली होती. पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी वन्नेरे याने सुरुवातीला २१ हजारांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. दुसऱ्या प्रकरणात महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व सहायक संचालक दिघेश तायडे यांना देण्यासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये अशी एकूण ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सोमवारी (९ डिसेंबर) दुपारी ३ वाजता सापळा रचला. त्यात प्रकरणासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना मनोज वन्नेरे याला रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. दिनेशसिंग पाटील, पोउनि. सुरेश पाटील, पोलिस नाईक किशोर पाटील, राकेश दुसाने यांनी ही कारवाई केली.

सहायक संचालकांची रात्री उशिरापर्यंत चौकशी, आयुक्तांनाही बोलावणार
मनपा आयुक्त ढेरे, सहायक संचालक तायडे यांच्यासाठी लाच मागितल्याचे लाचखोर नगररचना सहायकाने सांगितल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संध्याकाळी सहायक संचालकांना चौकशीसाठी बोलावले. रात्रीपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. मनपा आयुक्तांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी दिली

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now