‘खाकी’चा उरला नाही धाक! जळगावात बंद घर फोडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह टीव्ही लांबविला

डिसेंबर 4, 2024 11:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२४ । जळगाव शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या घटना सातत्याने वाढत असून यामुळे चोरट्यांना खाकीचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसून येत आहे. यातच जामनेर येथे बहिणीकडे गेलेल्या मंगलाबाई संजय गोपाळ (४०, रा. पिंप्राळा) यांच्या बंद घराची खिडकी तोडून अज्ञात चोरट्याने घरातून सोने चांदीचे दागिने तसेच एलईडी टीव्ही असा एकूण २१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

chori 2

मंगलाबाई गोपाळ या २४ नोव्हेंबर रोजी जामनेर येथे बहिणीकडे गेल्या होत्या. त्यामुळे घर बंद होते. ही संधी साधत चोरट्याने बंद घराची खिडकी तोडून १० हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही, सोने-चांदीचे दागिने असा एकूण २१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. २ डिसेंबर रोजी मंगलाबाई या घरी आल्या त्यावेळी घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकों जितेंद्र राठोड करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now