शेतकऱ्यांनो..रब्बी हंगामासाठी पाणी हवंय? या तारखेपर्यंत करा अर्ज..

नोव्हेंबर 29, 2024 2:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२४ । वाघुर धरण विभाग जळगाव कार्यक्षेत्रातील वाघुर डावा कालवा व उजवा कालवा तसेच कालवा उपसा व जलाशय उपसा या प्रकल्पावर शक्य असेल तेथे कालव्याद्वारे (प्रवाही) तसेच अधिसुचीत / अनाधिसुचित लाभक्षेत्रातील नदी, नाला व इतर जलाशयातून उपसा सिंचनाने पाण्याचा उपयोग घेणा-या सर्व बागायतदारांनी चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यानुसार रब्बी हंगाममध्ये 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 या मुदतीत कपाशी, ज्वारी, गहु, हरभरा, बारमाही भाजीपाला इतर तेलबिया कडधान्य व भूसार पिके इत्यादी पिकांसाठी पिण्याचे पाण्याचे आरक्षण व्यतिरीक्त उपलब्ध साठ्यातुन पाणी पुरवठा करणार असल्याचे वाघुर धरण विभागाचे उप कार्यकारी अभियंता प्र.अ. महाजन यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे कळविळे आहे.

rabbi pani water

उन्हखरीप हंगाम सन 2024-25 अखेर शेतकऱ्यांना संपूर्ण थकबाकी भरणे आवश्यक राहणार आहे, पाटमोट संबंध नसावा, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजुरी दिली जाईल, शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये, पाणी अर्जाचा निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत/ ग्रांमपंचायत कार्यालय नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल, मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जावर नियमानुसार जास्त पाणीपट्टी आकारणी केली जाईल. मंजुर क्षेत्रसच व मंजुर पिकानांच पाणी घ्यावे लागणार आहे. पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा किंवा खाते पुस्तीका संबंधित उपविभागास दाखवावी लागणार आहे. तसेच पाटबंधारे अधिनियम (कायदा) 1976 च्या प्रचलीत धोरणानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन आदेशानुसारच मंजुरी देण्यात येणार आहे.

या सर्व अटींच्या पूर्ततेसह नमुना नं. 7 पाणी अर्जावर मागणी करून पाणी अर्ज 1 डिसेंबर 2024 च्याआंत संबंधित वाघुर धरण उपविभाग क्र. 1 व 2 वराडसिम, वाघुर धरण उपविभाग क्र. 3 व 4 नशिराबाद या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर प्रत्यक्ष जमा कराण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

तसेच उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करून अन्नधान्याचे अधिक उत्पादन वाढवावे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे ठोक जलप्रशुल्क निर्धारण आदेश दि. 29 मार्च 2022 नुसार सुधारीत दराप्रमाणे केलेली आकारणी भरणे बंधनकारक राहील. असे प्रत्रकात म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now