जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्या तरुणाचा मृत्यू

नोव्हेंबर 26, 2024 4:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात हॉटेलमध्ये कामाला आलेला तरुण रात्री रस्त्यावरून पायी जात असताना एका अज्ञात वाहणारे जोरदार धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विकास आत्माराम चौधरी (वय ३४) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील विकास हा जळगाव शहरात एका हॉटेलमध्ये नोकरीला होता. दरम्यान २४ नोव्हेंबरला रात्री दहाच्या सुमारास विकास हा पायी जात असताना जळगाव एमआयडीसीतील रेमंड कंपनीसमोर अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. त्याच्या खिशातील कागदपत्रामुळे त्याची ओळख पटली. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान घरातील करता पुरुष गेल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now