जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक

नोव्हेंबर 23, 2024 4:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२४ । जळगाव शहर मतदार संघात भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांनी हॅट्रिक मारली आहे. आज जाहीर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात आमदार राजूमामा भोळे यांनी ८७ हजार ४७६ मतांनी आघाडी घेत विजयाचा गुलाल उधळला आहे.

rajumama bhole 1

जळगाव विधानसभा मतदारसंघात यंदा आमदार राजूमामा भोळे यांच्या विरूध्द लढण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक होते. तसेच भाजपमधून देखील इच्छुकांची संख्या वाढीस लागली होती. अर्थात पक्षातील प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आ. राजूमामा भोळे यांना तिसऱ्यांना भाजपची उमेदवारी मिळाली.

यामुळे भाजपमधून बंडखोरी करत माजी उपमहापौर डॉ. अश्वीन सोनवणे आणि माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. तर दुसरीकडे शिवसेना-उबाठातून माजी महापौर जयश्री महाजन यांना तिकिट मिळाल्याने बंडखोरी करत माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे देखील मैदानात उतरल्यामुळे येथे बहुरंगी लढत झाली. जिल्ह्यातील सर्वाधीक 29 उमेदवार येथूनच निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले.

दरम्यान २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यांनतर आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यात जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांनी विजय मिळविला. राजूमामा भोळे यांना एकूण १ लाख ५० हजार १९८ मते मिळाली. तर महायुतीच्या उमेदवार जयश्री महाजन यांना ७२ हजार ७२२ मते मिळाली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now