साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

नोव्हेंबर 22, 2024 5:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील दहिगाव येथे एक दुर्दैवी घटना समोर आलीय. साप पकडताना कोणतेही साधन नसताना प्रयत्न करायला गेलेल्या शेतमजुराला सापाने दंश केला. यात शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दिलीप मोतीराम पाटील (वय ४५) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

dahigaon

दहिगाव येथील दिलीप मोतीराम पाटील हे दत्तनगर शेजारील मोकळ्या आवारात मका भरण्यासाठी गेलेले होते. दरम्यान दुपारच्या सुमारास विश्रांतीसाठी ते जवळच्या श्री स्वामी समर्थ बैठक हॉलमध्ये बसले होते. याचवेळी त्यांना साप दिसला. सापाला पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता, सापाने त्यांना दंश केला.

यानंतर त्यांना जळगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. चावा घेणारा साप घोणस जातीचा विषारी साप होता. रुग्णालयात उपचार सुरु असताना दिलीप पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now