निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू

नोव्हेंबर 21, 2024 8:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेले लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (वय -49) उपशिक्षक अनवर्दे -बुधगांव हे मतदान ( बी. एल.ओ.) कर्तव्यावरून त्यांच्या बभळाज तालुका शिरपूर मूळगावी परत जात असताना मोटारसायकलचा अपघात झाला. त्यात त्यांचा दुर्देवाने मृत्यू झाला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी या अत्यंत दुर्देवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

lakshmikant patil

लक्ष्मीकांत वासुदेव पाटील हे चोपडा तालुक्यातील अनवर्दे बुधगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. परिवारासह ते गावात राहत होते.दरम्यान त्यांची निवडणुकीनिमित्त शासनाने ड्युटी लावली होती. मतदान कर्तव्यावर असताना व काम आटोपून घरी बभळाज गावी रात्री परत जात असताना संध्याकाळी ७ वाजेनंतर हातेड गलंगी दरम्यान व चोपडा शिरपूर रस्त्यावर गलंगी चौकात त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.

त्यांना नागरिकांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान घटनेबद्दल चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे लक्ष्मीकांत पाटील यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now