जळगावात लाखो रुपयांचा गुटखा जप्त

नोव्हेंबर 19, 2024 3:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आलाय. जळगाव शहरातील न्यू सम्राट कॉलनी येथे एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून संशयित आरोपीला मुद्देमालासह अटक केली. शुभम नरेश कुमार हंडी असं अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

gutkha

याबाबत असे की, शहरातील न्यू सम्राट कॉलनी येथील संशयित आरोपी शुभम नरेश कुमार हंडी हा त्याची दुचाकी क्रमांक (एम एच १९ ईडी ४०१४) वरून डिकीत व त्याचे राहते घराच्या खोलीत प्रतिबंधित गुटखा विक्रीकरिता बाळगून असलेला आढळून आला. तो त्याची चोरटी विक्री व वाहतूक करीत असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल २ लाख ७४ हजार रुपयांचा जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डी वाय एस पी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, रवी नरवाडे, संजय हिवरकर, हरीलाल पाटील, राजेश मेंढे, विजय पाटील, अक्रम शेख, प्रदीप चवरे यांनी केली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now