भडगाव हादरले! ६५ वर्षीय मूकबधिर महिलेवर तरुणाचा अत्याचार

नोव्हेंबर 17, 2024 1:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भडगाव तालुक्यातील एक खळबळजनक प्रकार समोर आलाय. २७ वर्षीय तरुणाने मध्यरात्री मूकबधिर महिलेवर अत्याचार करून पळ काढला. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्यात फरार झालेल्या आरोपीला एका तासाच्या आत भडगाव पोलिसांनी अटक केली आहे.

crime 1 jpg webp

याबाबत असे की, तालुक्यातील एका गावात १५ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ६५ वर्षीय मूकबधिर महिला ही तिच्या अंगणात झोपली होती. यावेळी गावातील २७ वर्षीय तरुणाने अत्याचार करून केला. यावेळी महिलेने आरडाओरड केली तेव्हा नातेवाईक जागे झाले तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता.

या घटनेची माहिती भडगाव पोलिसांना मिळताच भडगाव पोलिस स्टेशनचे पथकातील यांनी आरोपीला एका तासाच्या आत अटक केली. याबाबत २७ वर्षीय तरुणाविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now