Jalgaon : मध्यरात्री उठून कुसुंब्याच्या तरुणाने उचलले टोकाचं पाऊल..

नोव्हेंबर 16, 2024 8:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२४ । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी पहाटे उघडकीस आली. लहू बाळू पाटील (३५, रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून आत्महत्यामागील कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

cirme

लहू बाळू पाटील हे औद्योगिक वसाहत परिसरात एका कंपनीत ते कामाला होते. शुक्रवारी रात्री लहू पाटील व त्यांचे कुटुंबीय पुढील खोलीत झोपले होते. मध्यरात्री २ ते अडीच वाजेदरम्यान ते पाणी पिण्यासाठी उठल्याचे पत्नीने पाहिले होते. मात्र त्यानंतर मध्यरात्री लहू पाटील यांनी मागील खोलीत जाऊन गळफास घेतला.

आज सकाळी ६ वाजता पत्नी झोपेतून उठल्यानंतर मागील खोलीचा दरवाजा लोटला असता पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. पत्नीने हंबरडा फोडला. कुटुंबीयांनी शेजारील मंडळी व नातेवाईकांच्या मदतीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now