“वासुदेव आला रे, वासुदेव आला ! गुलाबभाऊंच्या साथीनं धनुष्यबाण आला !”

नोव्हेंबर 15, 2024 5:33 PM

“गावा -गावात वासुदेवांचा गजर : गुलाबभाऊंच्या प्रचाराचा नवीन फंडा !”

Vasudev GP

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२४ । जळगाव ग्रामीण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ वासुदेवांचा रंगीबेरंगी फंडा आता गावोगावी गाजत आहे. “वासुदेव आला रे, वासुदेव आला!” या उत्साही गजरात, वासुदेवांनी धनुष्यबाणाच्या प्रचाराची धूमधडाका उडवून दिला आहे.

हातात चिपळ्या, गळ्यात गजरा आणि मुखावर आत्मीयतेचा भाव, वासुदेवांचा ताफा प्रत्येक गावात थेट चौका – चौकात, घराघरात जाऊन प्रचार करत आहे. त्यांच्या गीतांमधून गुलाबभाऊंच्या विकासाचा व धनुष्यबाणाचा इतिहास उलगडत आहे.

वासुदेवांचा प्रचार फंडा म्हणजे शिवसेनेची आपुलकीची आणि हृदयाला भिडणारी प्रचार शैली आहे. “गुलाबराव पाटील म्हणजे ‘हक्काचा आपला माणूस’, तुमच्यासाठी उभा राहणारा नेता,” असा ठसा त्यांच्या गीतांतून उमटत आहे.

वासुदेवांचा आवाज, चिपळ्यांचा ताल आणि त्यांच्या उत्साही गजरामुळे गावा- गावात धनुष्यबाणाच्या प्रचाराला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील वातावरण शिवसेनेच्या रंगात रंगले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now