जळगाव लाईव्ह न्यूज । विद्यार्थ्यांमध्ये संशोधन करण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अविष्कार २०२५ विभागीय स्तरावर आयोजन करण्यात आले.२००६ पासून ही स्पर्धा सूरू असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे अंतर्गत विदर्भ, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), नाशिक/जळगाव, लातूर/नांदेड,सोलापूर/पुणे व कोल्हापूर या झोन्सचा समावेश आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री सुभाष पाटील (चेअरमन, मास्टेक कंट्रोल्स)यांच्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ.राजकुमार शिरसाम (निरीक्षक, केमिकल टेक्नॉलॉजी, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी), प्रा. रोशन बोंडे (निरीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी), डॉ. जगदीश जाधव (आरसीपीआयटी शिरपूर) उपस्थित होते.सुरुवातीला सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रस्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी इनोवेशन, इन्वेंशन, स्टार्टअप आणि इंक्युबेशन ही आजच्या काळाची गरज आहे व त्या अनुषंगाने प्रत्येक विद्यार्थ्याने काम करणे गरजेचे आहे. सहभागी स्पर्धकांना त्यांच्या पोस्टर प्रेसेंटेशन साठी शुभेच्छा दिल्या. डॉ. राजकुमार शिरसाम यांनी कटिंग एज टेक्नॉलॉजी संदर्भात माहिती देवून अशा स्पर्धांमधूनच विद्यार्थ्यांमध्ये प्रगल्भता निर्माण होते असे त्यांनी नमूद केले.प्रमुख पाहुणे श्री. सुभाष पाटील यांनी विद्यार्थ्यांना आगामी काळात नावारूपाला येणा—या टेक्नॉलॉजी तसेच यासाठी संशोधनाला वाव असल्याचे सांगत सहभागी स्पर्धकांना सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या.स्पर्धा कॉमर्स मॅनेजमेंट लॉ, प्युअर सायन्स, एग्रीकल्चर निमल हसबंडरी, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, मेडिसिन फार्मसी, ह्युमेनिटी लैंग्वेज फाईन आर्ट या सहा कॅटेगिरीच्या माध्यमातून स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या सहाही पदवी आणि पदव्युत्तर विभागतील स्पर्धकांना प्रत्येकी सुवर्ण, रजत आणि कास्य पदक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.विद्यापीठाकडून १२ पर्यवेक्षक तसेच १निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आलेली होती.सदर यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ.केतकी पाटील (सदस्य) व डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजी)* यांनी कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे समन्वयक विद्युत विभागाचे प्रा. नेमीचंद सैनी, प्रा. जयश्री पाटील, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग तसेच कमिटी मेंबर योनी परिश्रम घेतले. उद्घाटन प्रसंगी सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थिनी तुळजा महाजन व निलक्षी बर्डे व समारोपप्रसंगी हेमांगी बाबा व श्रुती सोनार या विद्यार्थिनींनी केले तसेच आभार प्रदर्शन प्राध्यापक नेमीचंद सैनी(अविष्कार समन्वयक) यांनी मानले.
कॉमर्स, मॅनेजमेंट, लॉ पदवी विभाग गोल्ड मेडल यश अहिरराव एस व्ही के एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे, सिल्वर मेडल सौरव शिंदे एस व्ही के एम फार्मसी धुळे,ब्राँझ मेडल भूमी चव्हाण नर्मदा बेन ठक्कर फार्मसी नंदुरबार पदव्युत्तर विभाग गोल्ड मेडल हर्षल निहुंभ एस व्ही के एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे,सिल्वर मेडल अभय पाटील एस व्ही के एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे,प्युअर सायन्स पदवी विभाग गोल्ड मेडल आर्या बागुल नर्मदा बेन ठक्कर फार्मसी नंदुरबार, सिल्वर मेडल अनार्य सोनवणे आरसीपीआयटी शिरपूर,ब्राँझ मेडल महिमा साबळे रुपेश बधान फार्मसी धुळे पदव्युत्तर विभाग गोल्ड मेडल नयन कुमार पाटील एस व्ही के एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे, सिल्वर मेडल,नूर अली एस व्ही के एम फार्मसी धुळे,ब्राँझ मेडल संकेत सोनार एस व्ही के एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे एग्रीकल्चर अँड निमल हसबंडरी पदवी विभाग गोल्ड मेडल झीशान पिंजारी पीजी कॉलेज ऑफ फार्मसी चौपाळे नंदुरबार सिल्वर मेडल,नेहा जोशी महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नाशिक,ब्राँझ मेडल पुनम चव्हाणमहावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नाशिक पदव्युत्तर विभाग गोल्ड मेडल योगिनी पाटील एस व्ही के एम फार्मसी धुळे सिल्वर मेडल सचिन तिवारी संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,भुसावळ ब्राँझ मेडल अर्पिता पाटील एस व्ही के एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे,इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी पदवी विभाग गोल्ड मेडल मुसाब चव्हाण एस व्हि के एम फार्मसी धुळे सिल्वर मेडल पायल पाटील आर सी पी आय टी शिरपूर ब्राँझ मेडल सार्थक पाटील आरसीपीआयटी शिरपूर पदव्युत्तर विभाग गोल्ड मेडल,हितेन निकम एस व्ही के एम फार्मसी धुळे सिल्वर मेडल, चेतन देसले एस व्ही के एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे ब्राँझ मेडल प्रशांत खरे एस व्ही के एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे मेडिसिन अँड फार्मसी पदवी विभाग गोल्ड मेडल दुर्गेश्वरी पाटील एस एस व्ही पी एस धुळे, सिल्वर मेडल वेदांत महाजन गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग भुसावळ,ब्राँझ मेडल अश्विनी सैंदाणे एस व्ही के एम फार्मसी धुळे पदव्युत्तर विभाग गोल्ड मेडल चैताली परदेशी एस व्ही के एम फार्मसी धुळे,सिल्वर मेडल दीप्ती सूर्यवंशी एस व्ही के एम फार्मसी धुळे,ब्राँझ मेडल ललित बोरसे एस व्ही के एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे, ह्युमेनिटी, लैंग्वेज,फाईन आर्ट पदवी विभाग गोल्ड मेडल सेजल हिवरकर गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग भुसाव, सिल्वर मेडल अभिजीत पवार गोदावरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग जळगाव,ब्राँझ मेडल धनश्री जाधव मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येवला, पदव्युत्तर विभाग गोल्ड मेडल गणेश घरटे एस व्ही के एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे, सिल्वर मेडल कीमया पवार एस व्ही के एम फार्मसी धुळे,ब्राँझ मेडल सोमिया अहुजा एस व्ही के एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे