शरद पवारासह उद्धव ठाकरेंच्या जळगाव जिल्ह्यात होणार सभा; कुठे आणि कधी?

नोव्हेंबर 10, 2024 10:00 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून राज्यातील प्रमुख नेत्यांचे दौरे निश्चित झाले आहेत. महाविकास आघाडीचे तीन नेते पुढच्या आठवड्यात जिल्ह्यात सहा सभा घेणार आहेत. त्यात सोमवारी खासदार शरद पवार यांच्या चार तर उद्धव ठाकरेंच्या दोन सभा होतील. खासदार संजय राऊत हे दोन दिवस मुक्कामी थांबणार आहेत.

udhav sharad

सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची चाळीसगाव येथे दुपारी १२ वाजता तर चोपडा येथे सायंकाळी ७ वाजता सभा होणार आहे. त्यासाठी ठाकरे विमानाने जळगावला येतील. तेथून हेलिकॉप्टरने चाळीसगावला जातील. खासदार शरद पवार हे सोमवारी सकाळी जालना येथून पारोळा येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभेला हजेरी लावतील.

त्यानंतर दुपारी २ वाजता शिंदखेडा येथून निघून जामनेरला चार वाजता सभा घेतील. ५ ते ६.३० वाजेदरम्यान मुक्ताईनगरला व त्यानंतर धरणगाव येथे ७.३० ते ९ वाजेदरम्यान जाहीर सभा होणार आहे. शरद पवार हे सोमवारी जळगावात मुक्कामी थांबणार आहेत. खासदार संजय राऊत हे देखील १३ व १४ नोव्हेंबर असे दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यात ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांचे प्रत्येक मतदारसंघात सभांचे नियोजन सुरू झाले असल्याचे संबंधित पक्षांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now