बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा वृद्धाचा जागीच मृत्यू; दिवाळी उत्सवात कुटुंबावर दुःखाचा डोंगर

नोव्हेंबर 1, 2024 11:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२४ । भरधाव बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अमळनेर तालुक्यातील देवगाव- देवळी गावाच्या खडकी नाल्याजवळ घडली आहे. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Bhanudas Patil

चोपडा तालुक्यातील खाचणे येथील भानुदास पुंडलिक पाटील (वय ६४) हे खाचणे येथून कामानिमित्त दुचाकीने अमळनेरकडे जात होते. या दरम्यान देवगाव- देवळी फाट्याजवळ चोपड्याहून बदलापूरकडे जाणाऱ्या बसचालकाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात भानुदास पाटील रस्त्यावर दूरवर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला, चेहऱ्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर
बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. कुटुंबातील करता व्यक्ती गेल्याने ऐन दिवाळी सणाच्या उत्सवात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान भानुदास पाटील यांच्या चुलत भावाच्या फिर्यादीवरून बसचालक शेख मिनाजोद्दीन जहिरोद्दीन (रा. अडावद, ता. चोपडा) याच्याविरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार सुनील पाटील तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now