स्वस्तात लक्झरी कार देण्याचे आमीष दाखवून जळगावच्या तरुणाला लाखोंचा चुना

ऑक्टोबर 30, 2024 2:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून अशातच जळगाव च्या तरुण व्यावसायिकाला लाखोंचा चुना लावला आहे. स्वस्तात लक्झरी कार देण्याचे आमीष दाखवून जळगावच्या व्यावसायिक तरुणास पाच लाखात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नाशिकच्या फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud jpg webp

जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरात वास्तव्यास असलेला पियूष कमलकिशोर मणियार (वय २६) यास कार घ्यायची होती. यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी तपास केल्यावर नाशिक येथील सिडको नगरातील संदेश चंद्रकांत काजळे याचा जुन्या वाहन खरेदी- विक्रीचा व्यवसाय असून, त्याने मणियार यांना चांगली कार देण्याचे सांगितले. दोघांचे बोलणे झाल्यावर संदेश काजळे याने कारच्या कागदपत्रांची झेरॉक्स पाठविली. सोबत कारही दाखविली.

कार पसंत पडल्यावर आयूष मणियारने संदेश काजळे यास पाच लाख रुपये रोख स्वरुपात देत जानेवारी २०२४ मध्ये कार घेतली. तेव्हापासून कार आयूष मणियार यांच्याजवळ होती. मात्र कारची तपासणी केल्यावर संदेश काजळे याने दिलेल्या कारचे दस्तऐवज (Fraud Case) बनावट असून, कारची नंबरप्लेटही खोटी असल्याचे निदर्शनास आले. यावरून आयुष मणियार यांनी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक सुनील बडगुजर तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now