जळगाव ग्रामीणमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

ऑक्टोबर 30, 2024 12:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून जळगाव ग्रामीणमधील अनेकांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. यातच विटनेरच्या सरपंचांसह सर्व सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अर्थात, या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यात त्यांना यश आले आहे.

JL Shivsena

म्हसावदचा प्रचार दौरा आटोपल्यावर विटनेरच्या सरपंच स्नेहा ललित साठे, सोसायटीचे चेअरमन तथा माजी सरपंच ललित साठे, ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेचे नेते तथा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवून अ‌ख्खी ग्रामपंचायतच शिवसेनेत दाखल झाली आहे. विटनेर हे गाव राजकीयदृष्ट्या निवडणुकीचे नेहमीच केंद्रबिंदू ठरले आहे.

स्वर्गीय भिलाभाऊ सोनवणे यांच्यामुळे त्या कालखंडात विटनेर येथे पंचायत समितीचे सभापती, उपसभापती अशी विविध पदे मिळाली होती. विद्यमान सरपंच स्नेहा ललित साठे, जळगाव पंचायत समितीचे माजी सभापती हरिभाऊ साठे यांचे चिरंजीव तथा विकास सोसायटीचे माजी चेअरमन व माजी सरपंच ललित साठे, विद्यमान विकास सोसायटी चेअरमन व माजी सरपंच नितीन ब्रह्मेचा (जैन ), तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबूदादा पिंजारी तसेच ग्रा.पं. सदस्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून पालकमंत्री तथा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती साहेबराव वराडे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष अर्जुन पाटील, पी. के. पाटील, उपजिल्हाप्रमुख रवी कापडणे, अनिल भोळे, जळगाव तालुकाप्रमुख शिवराज पाटील, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, दूध संघाचे रमेश पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक नारायण चव्हाण, महेंद्र पाटील, बापू धनगर, गोविंदा पवार व अनिल सोनवणे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती देण्यात आली आहे.

यांचाही शिवसेनेत प्रवेश :
म्हसावद येथील भोई समाजाचे बापू भोई, युवराज धोत्रे, दिलीप शिरोळे , मोहंमद शाह, रामा धोत्रे, प्रकाश धोत्रे, गोविंदा शिरोळे, लक्ष्मण धोत्रे, जितेंद्र भोई, हिरामण धोत्रे, गोविंदा शिरोळे, अजय भोई, अनिल शिरोळे, उदय धोत्रे, रोहिदास धोत्रे, मंगेश भोई, रामू शिरोळे, अशोक शिरोळे, संतोष धोत्रे, पिराजी शिरोळे, कडू धोत्रे, राहुल शिरोळे, भास्कर शिरोळे, अशोक शिरोळे, मुकेश शिरोळे, दशरथ धोत्रे, संतोष धोत्रे व सखाराम धोत्रे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now