आमदार राजूमामा भोळे सोमवारी २८ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

ऑक्टोबर 27, 2024 6:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार सुरेश भोळे हे उद्या दि. २८ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले जाणार होणार यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती राहील.

Suresh Bhole RajuMama jpg webp

विधानसभा निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबरपर्यत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. सोमवारी(दि २८) जळगाव शहराचे आमदार राजूमामा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ३ मंडळ अध्यक्षासह सर्व पदाधिकारी अर्ज भरतांना हजर राहणार असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.

आमदार राजूमामा भोळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीचा मार्ग..
शिवतीर्थ चौक व भाजपा कार्यालय (जी. एम. फाउंडेशन), नेहरू चौक, डॉ. आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन, टॉवर चौक, प्रकाश मेडिकल चौक, बळीराम पेठ ,वसंत स्मृती, भाजप कार्यालय

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now