⁠ 
रविवार, ऑक्टोबर 27, 2024
Home | जळगाव जिल्हा | दिवाळी तोंडावर सोने-चांदी भावात पुन्हा वाढ; खरेदीपूर्वी वाचा जळगावातील आजचे भाव?

दिवाळी तोंडावर सोने-चांदी भावात पुन्हा वाढ; खरेदीपूर्वी वाचा जळगावातील आजचे भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२४ । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने-चांदीच्या दरात सातत्याने बदल होत आहेत. दिवाळी तोंडावर आली असताना दोन्ही मौल्यवान धातू त्यांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहेत. यामुळे ग्राहकांना मोठी झळ सोसावी लागतेय. दरम्यान जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्यासह चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे.

दोन दिवसापूर्वी ६०० रुपयाची घसरण झालेल्या सोने दरात शनिवारी ७०० रुपये प्रति तोळा वाढ झाली आहे. यामळे आज रविवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,९७० रुपये प्रति तोळा तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७९,६०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर जीएसटीसह सोने ८१,९८८ या आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.

दुसरीकडे शनिवारी चांदी दरात १ हजार रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे चांदीचा एक किलोचा भाव ९९,००० रुपयावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात चीनमधील बँकांनी व्याजदर घटवले व युद्धजन्य परिस्थितीत वाढ झाल्याने चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ होऊन प्रथमच १ लाख रुपये किलोवर (विना जीएसटी) गेले होते. मात्र दोन दिवसापूर्वी घसरण झाली होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.