शरद पवार गटाची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर ; जळगाव जिल्ह्यात कोणाकोणाला संधी?

ऑक्टोबर 24, 2024 6:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२४ । विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आपल्या 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. यामुळे आता जळगाव ग्रामीणमधून तर जामनेरमधून दिलीप घोडपे यांना संधी देण्यात आली आहे. तसेच मुक्ताईनगरमधून आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

sharad pawar jpg webp

विशेष म्हणजेच बारामतीमधून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार यांच्यात आता थेट लढत बघायला मिळणार आहे. याआधी लोकसभेतही राष्ट्रवादीच्या पवार कुटुंबातीलच नणंद-भावजयी यांच्यात लढत बघायला मिळाली होती. आता बारामती विधानसभेत काका-पुतण्यात राजकीय लढाई होणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी ही लढाई कठीण असणार आहे.

शरद पवार पक्षाच्या उमेदवारांची यादी
जयंत पाटील – इस्लामपूर
अनिल देशमुख – काटोल
राजेश टोपे – घनसांगवी
बाळासाहेब पाटील – कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा
शशिकांत शिंदे – गोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर – वसमत
गुलाबराव देवकर – जळगाव ग्रामीण
दिलीप घोडपे – जामनेर
रोहिणी खडसे – मुक्ताईनगर ​​​​​​​
हर्षवर्धन पाटील – इंदापूर
प्राजक्त तनपुरे – राहुरी
अशोकराव पवार – शिरुर ​​​​​​​
मानसिंगराव नाईक – शिराळा ​​​​​​​
सुनील भुसारा – विक्रमगड
​​​​​ रोहित पवार – कर्जत जामखेड
विनायकराव पाटील – अहमदपूर ​​​​​​​
राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा
सुधाकर भालेराव – उदगीर
चंद्रकांत दानवे – भोकरदन ​​​​​​​
प्रदीप नाईक – किनवट ​​​​​​​
विजय भांबळे – जिंतूर
पृथ्वीराज साठे -केज ​​​​​​​
संदीप नाईक – बेलापूर ​​​​​​​
पुसाहेब पठारे – वडगाव शेरी
सम्राट डोंगरदिवे – मूर्तीजापूर ​​​​​​​
दिनेश्वर पेठे – नागपूर पूर्व
रविकांत गोपचे – तिरोडा ​​​​​​​
भाग्यश्री आत्राम – अहेरी ​​​​​​​
रुपकुमार ऊर्फ बबलू चौधरी – बदनापूर ​​​​​​​
सुभाष पवार – मुरबाड ​​​​​​​
राखी जाधव – घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम – आंबेगाव ​​​​​​​
युगेंद्र पवार – बारामती
संदीप वरपे – कोपरगाव
प्रताप ढाकणे – शेवगाव ​​​​​​​
राणी लंके -पारनेर ​​​​​​​
मेहबूब शेख – आष्टी ​​​​​​​
नारायण पाटील – करमाळा ​​​​​​​
महेश कोठे – सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव – चिपळूण
समरजित घाटगे – कागल
रोहित आर. पाटील – तासगाव कवठेमहांकाळ
​​​​​​​प्रशांत जगताप -हडपसर

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now