⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | रेल्वेच्या क्षेत्रीय उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यपदी दीपक साखरे यांची निवड

रेल्वेच्या क्षेत्रीय उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यपदी दीपक साखरे यांची निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्य पदी दीपक साखरे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र रेल्वे मंत्रालयाकडून नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे.

ही निवड दोन वर्षासाठी असून ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत समितीचा कार्यकाळ राहणार आहे. यामध्ये मध्य रेल्वे क्षेत्रात महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक या तिन राज्यातील मुंबई सेंट्रल, सोलापूर, भुसावळ, पुणे, नागपूर मंडळाचा समावेश असून सुमारे ५०० रेल्वे स्थानक या क्षेत्रात येतात. रेल्वे प्रवाश्यांच्या हीताचे प्रश्न मांडून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दीपक साखरे यांनी कळविले आहे.

या निवडीबद्दल त्यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रिय मंत्री रक्षा खडसे, खा. स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे आणि राज्याच्या विशेष वैद्यकीय मदत सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्‍वर नाईक यांचे आभार मानले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.