जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक केलेल्या वक्तव्यचा मुक्ताईनगर तालुक्यातील मराठा बांधव व सामाजिक संघटनांतर्फे निषेध व्यक्त करत राज्यपाल यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन येथील तहसीलदार यांच्या माध्यमातून राष्ट्रपती व मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल बेताल वक्तव्य करुन मुक्ताफळे काढली आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराज हे एक स्वतंत्र स्वयंभु व्यक्तीमत्व होते. त्यांची स्वराज्याची संकल्पना ही छत्रपती शहाजीराजे भोसले यांची होती. तर सामाजिक व राजकीय क्षेत्रात ती पुर्णत्वास नेण्यासाठी राजमाता जिजाऊंनी त्यांना प्रक्षिशण दिले. जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या किर्तनातुन ‘वारकऱ्यां बरोबर धारकरी मावळे’ निर्माण केले. त्यामुळे राजे स्वराज्याचे स्वत:समर्थ झाले व छत्रपती झाले. संत तुकाराम महाराज यांनी आपल्या किर्तनातुन, अभंगातून त्यांना ‘छत्रपती’ हि पदवी बहाल केली होती. म्हणजे त्यांना साऱ्या विश्वाचा ‘छत्रपती’ म्हणुन त्यांचा जयघोष केला. त्यांच्या काळात रामदासांचा व छत्रपतींचा कधीही कुठेही संबंध किंवा गाठभेट झाल्याचे पुरावे आढळत नाही. आणि याबाबतीत औरंगाबाद हायकोर्टाने १८ रोजी निकाल देताना शिवराय व रामदासाची भेट गाठ झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्याने आपल्या बाजूने निकाल दिलेला आहे. त्यामुळे राज्यपालांनी उच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे. तसेच बेताल व्यक्तव्य करुन शिवप्रेमींच्या भावना दुखावतील असे कृत्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येऊन त्यांना पदावरुन हटविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. आहे.

याप्रसंगी मराठा तालुका अध्यक्ष अनंतराव देशमुख, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, सचिव यु.डी. पाटील, सदस्य दिलीप पाटील, ईश्वर रहाणे, मणियार बिरिदरी, जिल्हाध्यक्ष हकीम चौधरी, दिनेश कदम, संतोष मराठे, छबिलदास पाटील, जितेंद्र पिटील, शेषराव पाटील, अमोल पाटील, रतीराम पाटील, किरण महाजन, सचिन सपकाळ, यासीन खान, रविंद्र दांडगे, प्रविण कांडेलकर, कृष्णा पाटील उपस्थित होते.







