जळगाव जिल्ह्यातील पोलिसांची लॉटरी, अनेकांना मिळाली पदोन्नती

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । जिल्ह्यातील पोलीस शिपाई व पोलीस नाईक संवर्गात मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती जाहीर करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी नुकतेच यादी जाहीर केली आहे. ८९ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी तर १२० पोलीस शिपाई यांना पोलीस नाईकपदी बढती मिळाली आहे.

जिल्ह्यातील पोलीस नाईक व पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना नुकतेच बढती देण्यात आली असून याबाबतची अधिकृत यादी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. 

पदोन्नती समितीमध्ये पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रभारी उपअधीक्षक दिलीप पाटील, कार्यालय अधीक्षक नागेश हडपे, आस्थापना लिपिक दीपक जाधव, सुनील निकम यांचा समावेश होता.

पदोन्नती मिळालेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधिक्षकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.