तार चोरी करणाऱ्या चौघांच्या पाठलाग करून आवळल्या मुसक्या

ऑक्टोबर 20, 2024 1:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२४ । भादली वीज उपकेंद्राच्या परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास ९० हजार रुपये किमतीची अॅल्युमिनियमची तार चोरी करून जाणाऱ्या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून पकडले. रहीम खान रशीद खान, मोसीन शहा सिकंदर शहा, शाहरुख शहा सिकंदर शहा, अफजल खान उर्फ फावड्या रशीद खान (सर्व रा. तांबापुरा) असे या आरोपींचे नाव असून

crime 2 jpg webp

भादली वीज उपकेंद्राच्या परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास ९० हजार रुपये किंमतीची अॅल्युमिनियमची तार चोरी झाली होती. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरलेली तार घेऊन चोरटे जळगावकडे येत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. चोरटे अजिंठा चौफुलीकडून ईच्छादेवी चौफुलीकडे रिक्षातून तार घेवून जाताना दिसताच पथकाने त्यांचा पाठलाग करीत वरील रेकॉर्डवरील सराईत चौधं गुन्हेगारांना ताब्यात घेतले.

यांनी केली कारवाई
त्यांनी भादली येथून चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक जगदाळे, पोलिस नाईक प्रदीप चौधरी, किशोर पाटील, योगेश बारी, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, नाना तायडे, सिध्देश्वर डापकर यांनी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now