जळगावातील ॲड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक

ऑक्टोबर 19, 2024 11:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२४ । जळगाव शहरामधील प्रतापनगर येथील श्री स्वामी समर्थ दिवशी केंद्राचे अतिक्रमण हटवण्यास विरोध करत तरूणांनी ॲड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी १० ते १२ जणांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

crime 2 jpg webp

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील प्रताप नगर परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण असण्याच्या कारणावरून गेल्या अनेक वर्षांपासून तक्रार आहे. हे अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आल्याने ते काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यावरून काहीजण संतप्त झाले. त्यामुळे शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मोठा जमाव प्रताप नगर परिसरातील धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जमला व अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविण्यात आला.

त्यानंतर जमावाने धार्मिक स्थळापासून जवळच असलेल्या ॲड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेथून १० ते १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते. ॲड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक करीत असताना जमावाने जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे मोठा गोंधळ उडाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now