शिवाजी नगरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

ऑक्टोबर 14, 2024 12:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील शिवाजी नगरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चौथऱ्याच्या कामाचे भूमिपुजन रविवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले.

bhoomipujan shivaji maharaj
shivaji maharaj bhoomipujan

शिवाजीनगर भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नाने केले जात आहे. या पुतळ्याच्या चौथऱ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, राजेंद्र मराठे, कुंदन काळे, आशुतोष पाटील, गणेश सोनवणे, निलेश पाटील,संतोष पाटील तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now