मुंबई हावडा एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची धमकी; जळगावात सुरक्षा दलाकडून रेल्वेची तपासणी

ऑक्टोबर 14, 2024 12:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२४ । हावडा वरून येणारी मुंबई-हावडा एक्सप्रेसला नाशिक येण्याआधी टायमर बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी रेल्वे विभागाला मिळाली आहे. ट्विटरवरून आलेल्या या धमकीच्या मेसेजनंतर जळगाव रेल्वे सुरक्षा बल आणि बॉम्बशोधक पथकाकडून जळगाव रेल्वे स्थानकावर मुंबई हावडा रेल्वे गाडी थांबवण्यात आली. गाडीची दोन तास तपासणी केल्यानंतर काहीही न सापडल्याने ही ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली आहे.

mail express bomb

रेल्वे सुरक्षा बलाने दिलेल्या माहितीनुसार, हावडा रेल्वे स्थानकावरुन मुंबईकडे येणाऱ्या 12809 या हावडा-मुंबई मेलमध्ये टायमर बॉम्ब ठेवला आहे. नाशिक स्थानक येण्याच्या आधी या गाडीत मोठा बॉम्बस्फोट होईल, असा धमकीचा मेसेज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ऑफ कंट्रोल ऑफिसला यानंतर रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली होती. मुंबई हावडा मेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.

मेसेज नंतर ट्रेन जळगाव स्थानकावर थांबवून रेल्वे प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने जळगाव रेल्वे स्थानकावर धाव घेतली. यानंतर या गाडीची पूर्णपणे तपासणी करण्यात आली. पहाटे 4:17 मिनिटांनी जळगाव रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबवली. रेल्वे सुरक्षा बल आणि बॉम्बशोधक पथकाकडून गाडीतील प्रत्येक डब्ब्यात जाऊन ही तपासणी करण्यात आली. तब्बल 2 तास 17 मिनिटे या गाडीची संपूर्ण तपासणी करण्यात आली. मात्र ट्रेनमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली न आल्यामुळे तपासणीनंतर ट्रेन पुढे मार्गस्थ करण्यात आली. या तपासणीनंतर 6 वाजून 28 मिनिटांनी ही एक्सप्रेस पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली. या माहितीला रेल्वे सुरक्षा बलाने विभागाकडून दुजोरा देण्यात आला आहे.

ट्वीटमध्ये नेमकं काय?
Fazluddin Nirban या नावाच्या ट्विटर अकाउंटवरून रेल्वे प्रशासनाला धमकीचा मेसेज मिळाला आहे. हिंदुस्तानी लोकांनी आजची सकाळ तुमच्यासाठी रक्तरंजित असणार आहे. आज एका फ्लाईटमध्ये आणि एका ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे. नाशिक येण्यापूर्वी खूप मोठा बॉम्बस्फोट होईल, असे एका व्यक्तीने ट्वीट केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now