नशिराबादला स्मार्ट सिटी करण्यासाठी प्रयत्न करेल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन

ऑक्टोबर 12, 2024 11:31 AM

नशिराबादला ५७ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेसह विकास कामांचे लोकार्पण

nashirabad

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे ५७ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेसह विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन ११ ऑक्टोबरला बसस्थानक चौकात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील टप्यात नशिराबादला स्मार्ट सिटी करण्यासाठी प्रयत्न करेल असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

कार्यक्रमात प्रास्ताविकात न. पा. चे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार व विविध विकास कामांचा अहवाल सादर केला. माजी सरपंच विकास पाटील वाघूर धरणावरून शहरासाठी नशिराबादकरांची तहान भागवणार असल्याने समाधान व्यक्त केले. जिल्हा प्रमुख नीलेश पाटील व जि. प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी देखील माहिती दिली. नगरपालिका, कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी फटाक्यांच्या आताशबाजीत, महिलांनी औक्षण करून, शाल श्रीफळ व बुके देऊन पालकमंत्र्यांचे स्वागत केले.

त्यानंतर पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार, डीपीडीसीच्या नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनातील २४ कामे, नगरोत्थान अंतर्गत १४ कामे, नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत ८ कामांचे भूमिपूजन, नगरोत्थान योजनेअंतर्गत ७ कामे, अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ९ कामे, दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत १ कामांचे लोकार्पण करण्यात आले. उपशिक्षक बंडू खंडारे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी सरपंच, ग्रा. पं. सदस्य, सोसायटी चेअरमन, पदाधिकारी, न. पाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now