नवरात्रीला रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी आदेश जारी

ऑक्टोबर 11, 2024 1:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२४ । सध्या सर्वत्र नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा सुरु आहे. नवरात्रीनिमित्त अनेक ठिकाणी गरबा, दांडीया सांसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. नवरात्रीच्या शेवटच्या तीन दिवसात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास प्रशासनाने परवानगी देण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढला आहे.

navaratri

१०,११, १२ ऑक्टोबर असे तीन दिवस लाऊडस्पीकर लावण्यास सरकारने परवानगी दिली आहे. या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक प्रसिद्ध करत आदेश जारी केले आहेत. ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 चे नियम 53 नुसार संपूर्ण जळगाव जिल्हयात नवरात्री उत्सवाकरीता दिनांक १०,११, १२ ऑक्टोबर या दिवशी रात्री १० ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सूट देण्यात आली आहे.

यासोबतच दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सूट देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now