जळगाव शहर हादरले! डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून महिलेची हत्या

ऑक्टोबर 10, 2024 11:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी थांबताना दिसत नसून अशातच जळगाव शहरातून महिलेच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आलीय. शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये एका महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. सुवर्णा राजेश नवाल (वय ५७) असे हत्या झालेल्या महिलेचं नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

murder jalgaon

या घटनेबाबत असे की, जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये सुवर्णा नवल या महिला आपल्या पती राजेश नवाल यांच्यासह वास्तव्याला होत्या. त्यांचे पती राजेश नावाल हे दाना बाजार परिसरामध्ये धान्याचे व्यापारी आहेत. दरम्यान आज रात्री ८.३० वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवल ह्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात घुसून लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला.

दरम्यान रात्री ८.३० वाजता मयत सुवर्णा नवल यांचे पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनांसाठी धाव घेतली आणि पुढच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. भरवस्तीमध्ये एका महिलेचा खून करण्यात आल्याने जळगाव शहरामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात पती राजेंद्र नवाल, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now