जळगावात दुकानांना भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

ऑक्टोबर 9, 2024 10:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२४ । जळगाव येथील नेरी नाका जवळील एसटी वर्कशॉप समोरील दुकानांना आज बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आलीय. या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी शनिपेठ पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

fire jalgaon

शेख साबीर इस्लाम (वय ४५, रा. सालार नगर) यांचे कुशन व रेक्झीनचे गोडावून आहे. या गोडावूनला अचानक आग लागली. यासोबतच त्यांच्या बाजूला असलेल्या सुधीरचंद मन्ना यांचे ऑटो गॅरेज दुकान आणि अशोक गुलाब महाजन यांच्या चहाच्या दुकानाला भीषण आग लागली.

या आगीची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन विभागाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले. या आगीत दुकानांच्या बाहेर लावलेल्या कार (एमएच ०४ इएच ७०१४) जळाल्याने तिचे नुकसान झाले.दरम्यान या ठिकाणी सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी घटनास्थळी भेट दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now