इलेक्ट्रिक तार चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात; ३८०० मीटर तार हस्तगत

ऑक्टोबर 9, 2024 1:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२४ । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इलेक्ट्रीक पोलवरील तार चोरी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीची ३८०० मीटर तार हस्तगत करण्यात आली आहे.

Three persons arrested

एरंडोल आणि कासोदा शेत शिवारातील परिसरातून महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक पोलवरील तार कारची चोरी केल्याप्रकरणी एरंडोल आणि कासोदा पोलीस ठाण्यात एकूण वेगवेगळे पाच गुन्हे दाखल होते. तारांचे चोरी करणारे संशयित आरोपी हे एरंडोल शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुन्हे उघडकिला आणण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या.

एलसीबीच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे कासोदा व एरंडोल शेत शिवारातील इलेक्ट्रीक पोलवरील तार चोरी करणारे इसम एरंडोल शहरात संशयीतरीत्या फिरत असल्याची बातमी मिळाली होती.पथकाने त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी रविंद्र अनिल मिस्तरी (वय ३८ रा.साई नगर, एरंडोल), धनराज प्रकाश ठाकुर (वय ४६ रा.अमळनेर दरवाजा, एरंडोल), समाधान नारायण पाटील (वय ४५ रा.नारायण नगर, एरंडोल) असे सांगीतले. त्यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शेतातील तार चोरी केल्याबाबत कबुली दिली.

त्यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रिक विद्युत तार जप्त करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी अटकेतील संशयित आरोपींना एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे

या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, विलास गायकवाड, राहुल बैसाणे, गोरख बागुल, भारत पाटील यांनी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now