आजपासून जळगाव जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता; थंडी कधी पडणार?

ऑक्टोबर 9, 2024 10:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२४ । जळगावसह राज्यभरात सध्या उन्हाचा चटका वाढला आहे. दुपारी १२ ते ३ वाजेच्या दरम्यान उन्हाचा चटका जाणवत आहे. हवेतील आर्द्रता आणि बदलते तापमान यांच्या प्रभावामुळे ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा जाणवतो आहे. मात्र आज बुधवारपासून जळगावसह राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

rain 4 jpg webp

९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस परतण्यास अनुकूल वातावरण झाले आहे. त्यामुळे आजपासून जळगाव जिल्ह्यात हवामान बदलून तुरळक पाऊस पडेल. १०, ११ व १२ ऑक्टोबर दरम्यान हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी १८ ते २५ मिलिमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान देखील अत्यंत तुरळक पावसाच्या शक्यतेसह वातावरण काहीसे ढगाळ राहू शकते.

त्यानंतर मान्सून संपून थंडीचा अनुभव येण्यास सुरुवात होईल, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now