जळगाव ग्रामीणमध्ये शरद पवार गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

ऑक्टोबर 6, 2024 3:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२४ । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगाव ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुसूंबा येथील शरद पवार गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वांचे स्वागत केलं.

Kusumba shivsena

कुसुंबा माजी सरपंच भाऊलाल नामदेव पाटील यांचे चिरंजीव मयुर भाऊलाल पाटील विकास सोसायटी सदस्य. तसेज ग्रा. पंचायत सदस्य बापूराव देवराम पाटील यांचे चिरंजीव किरण बापु पाटील, किरण पाटील अमोल पाटील, भूषन पाटील गिरीश पाटील, पंकज पाटील राहुल पाटील, पवन पाटील, वेदांत पाटील, साई पाटील, बंटी पाटील, चेतन पाटील अक्षय पाटील, विकास गायकवाड, समाधान कोळी, रामभाऊ पाटील, कार्तिक पाटील, करण पाटील, रोहित पाटील यांनी आज पाळधी येथे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते प्रवेश सोहळा संपन्न झाला.

यावेळी उपस्थित मण्यारखेडा येथील राजू भाऊ पाटील, माजी सभापती नंदू आबा पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, नारायण आप्पा सोनवणे, उमेश पाटील आव्हाने, आबा माळी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now