शेतकऱ्यांनी केला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२४ । जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने जळगाव ग्रामीणसह जिल्ह्यातील अनेक विकास कामे मजूर झाले. त्याचनुसार आता पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे ३० सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भागपूर उपसा सिंचन योजनेच्या तीन हजार ५३३ कोटींच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
या योजनेच्या सुधारित प्रस्तावामुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होणार असून, जळगाव तालुक्यातील भागपूर-वावडदासह २५ गावांच्या, तसेच जामनेर व पाचोरा तालुक्यांतील शेतकऱ्यांची ३० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून यानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य पवन सोनवणे, बिलवाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच विनोद पाटील, उपसरपंच धोंडू जगताप, ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, आबा गोपाळ, कार्यकर्ते सोपान पाटील, भरत पाटील व परिसरातील शेतकरी बांधव यांची उपस्थिती लाभली.
असा होईल फायदा?
ही योजना तापी नदीवर आधारित असून, पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी वाहून जाणारे अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी आणि उपसण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे. योजनेच्या माध्यमातून तापी नदीवरील शेळगाव बॅरेजमधून वाघूर नदीकाठच्या भागात पाणी साठवले जाणार आहे. या पाण्याचा उपयोग करून जळगाव तालुक्यातील २५ गावाच्या शेतकऱ्यांचे 13904 हेक्टर क्षेत्रावर सिंचन केले जाणार आहे, तर अजिंठा डोंगराच्या पायथ्यापासून ते पाचोरा तालुक्यापर्यंतच्या क्षेत्रात 16860 हेक्टर जमिनीला लाभ मिळणार आहे.