Jalgaon : लग्नाचे आमिष देऊन शारीरिक संबंध ठेवले, नंतर विवाहितेसोबत घडलं धक्कादायक..

ऑक्टोबर 5, 2024 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीय. अशातच जळगावमध्ये पती-पत्नीच्या वादाचा गैरफायदा घेत विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर तरुणाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे या अत्याचारातून पीडित विवाहिता गर्भवती राहिली असून तरुणाने ऐनवेळी लग्नास नकार दिला. हा प्रकार सन २०१८ ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला. याप्रकरणीतरुणाविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

crime 1 jpg webp

शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात बाहेर गावाहून जळगावात आलेली एक २६ वर्षीय विवाहिता पतीसह राहते. सदर विवाहिता व तिचा पती यांचे नेहमी भांडण होत असल्याचा गैरफायदा घेत विवाहितेच्या ओळखीचा तुषार आहिरे याने ‘पतीला घटस्फोट दे, मी तुझ्याशी लग्न करेल’ असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचारातून विवाहिता गर्भवती राहिली. विवाहितेने लग्नाचा आग्रह केल्यानंतर तरुणाने नकार दिला. याप्रकरणी विवाहितेने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे

गर्भपात करून घेण्याचा सल्ला
अत्याचारातून विवाहिता गर्भवती राहिल्याने ‘आता तरी लग्न कर व मला तुझ्या घरी घेऊन चल’, असे तिने तरुणाला सांगितले असता, ‘माझे लग्न झाले आहे, तु आता गर्भपात करून घे’, असे सांगत विवाहितेसोबत लग्न करण्यास नकार दिला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now