सुवर्णनगरीत टाटा समूहाच्या झुडियो स्टोअरचे ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

ऑक्टोबर 3, 2024 8:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२४ । जळगाव येथील इच्छादेवी चौकात सदोबा वेअरहाऊस परिसरात अग्रवाल मॉलमध्ये झुडियो स्टोअरचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते आज दिनांक 3/10/2024 रोजी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याच्या खासदार श्रीमती स्मिता उदय वाघ होत्या. झुडिओ स्टोअरही टाटा समूहाचे टाटा ट्रेन्स लिमिटेड या कंपनीचे स्टोअर आहे.

tata

सदरच्या स्टोअरची निर्मिती अमळनेर येथील उद्योगपती श्री बजरंगलाल बन्सीलाल अग्रवाल यांचे चिरंजीव श्री राधेश्याम बजरंगलाल अग्रवाल व त्यांचे पुतणे श्री नीरज दीपचंद अग्रवाल यांनी केली. सदरच्या स्टोअरची जागा ही लक्ष्मीकांत चौधरी यांची असून त्यांनी कराराने ही जागा दिली आहे. सदरच्या स्टोअरमध्ये अल्प दरात म्हणजे सर्व कपडे रुपये 29/- पासून 999/- रुपये पर्यंत सुमारे 25000 स्टॉक आईटम मिळणार आहे.

सदर स्टोअरची उद्घाटनाची प्रतीक्षा जळगावकर मागील एक महिन्यापासून करत होते. सदर स्टोअरच्या उद्घाटन प्रसंगी लक्ष्मीकांत चौधरी, मयूर चौधरी, राजेश अग्रवाल, अनुप अग्रवाल, बाळासाहेब भदाणे, झुडीयो स्टोअरचे मॅनेजर आतिफ खान,सिटी मॅनेजर उमेश भगत, नीरज अग्रवाल व जुडीयो स्टोरचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now