कामावरून घरी परताना तरुणावर काळाची झडप; अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

ऑक्टोबर 3, 2024 2:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच असून याच दरम्यान, मुक्ताईनगरातील तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी घोडसगाव येथील उड्डाणपुलावर घडली. शुभम राजू उंबरकार ( वय 22) असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

accident jpg webp

या घटनेबाबत असे की, वल्लभभाई पटेल नगरातील रहिवासी शुभम राजू उंबरकार हा पिंप्री अकाराऊत येथील पद्मश्री लॉन येथे ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. आज पहाटे एक वाजेच्या सुमारास तो कामावरून आपल्या घरी परत येण्यासाठी एमएच19 डीएक्स 9412 क्रमांकाच्या होंडा शाईन या दुचाकीने निघाला होता. तो घोडसगाव येथील उड्डाणपुलावर आला असता कोणत्या तरी अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात तो जायबंदी झाला.

परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन रूग्णवाहिका बोलावली. येथून त्यांच्या मामांशी संपर्क करून याबाबतची माहिती देण्यात आली. कुटुंबियांनी तात्काळी अपघातस्थळी धाव घेऊन शुभम याला उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र यापूवच त्याची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी मयत युवकाचे मामा संतोष मधुकर सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now