कर्जबाजारीला कंटाळून पारोळ्याच्या शेतकऱ्याने उचललं टोकचं पाऊल

सप्टेंबर 24, 2024 12:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२४ । शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले असून अशातच पारोळा तालुक्यातील हिरापूर शिवारात शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. महेंद्र विनायक सोनवणे (वय ३८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव त्यांनी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

parola farmer

महेंद्र विनायक सोनवणे त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. महेंद्र यांच्याकडे दोन बिघे जमीन आहे, त्यात यंदा कापसाच्या पिकाची लागवड केली होती. अतिपावसाने पीक खराब झाली आहे. त्यातच आठ दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांनी काढलेले बँकेचे पीककर्ज भरण्याची नोटीस आली होती, सततची नापिकी व येणाऱ्या उत्पन्नाचा सोर्स नसल्याने, हात उसनवार व सरकारी बँकांचे झालेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेत महेंद्र असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

सकाळी घरी कोणाला काही न सांगता महेंद्र हे घरातून निघून गेले. मात्र दुपारपर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास हिरापूर शिवारातील दत्तात्रेय पाटील यांच्या विहिरीजवळ त्यांच्या चपला आढळून आल्या. ग्रामस्थांनी विहिरीत उतरून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पारोळा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now