२८ वर्षीय महिलेच्या हत्येने अमळनेर हादरले !

सप्टेंबर 22, 2024 3:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत असून अशातच अमळनेरातून खुनाची एक धक्कादायक घटना समोर आलीय. २८ वर्षीय महिलेचा निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. शीतल जय घोगले (वय २८, रा. गांधलीपुरा, अमळनेर) असे मयत महिलेचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तपासाला लागले आहे.

amalnermurder

याबाबत असे की, अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात राहणारी शीतल घोगले ही महिला मृत अवस्थेत त्यांच्या भागातील रिकाम्या जागेत पडलेली दिसून आली. तिला डोक्याला मार लागलेला होता तसेच तिच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण तर डोक्यावर व हातावर वार केलेला दिसून आला. हा खून नेमका कोणी आणि का केला? याबाबत अद्याप माहिती समोर आलीय नसून हि घटना समोर आल्यांनतर परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, गणेश पाटील, सागर साळुंखे, निलेश मोरे, जितेंद्र निकुंभे, अमोल पाटील, सिद्धांत शिसोदे, स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रवी पाटील, दीपक माळी, संदीप पाटील यांनी पाहणी केली. दरम्यान महिलेचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी विविध दिशेने तपास चक्रे फिरवायला सुरुवात केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now