बाजार करून दुचाकीने घरी निघाले, पण वाटेतच घडलं भयंकर; बापलेकाचा मृत्यू, पत्नी गंभीर

सप्टेंबर 22, 2024 2:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२४ । रस्ते अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दररोज या घटनांमध्ये वाढ होत असून यात अनेकांना जीवावर मुकावे लागत आहे. अशातच बाजार करून घरी परतताना कुटुंबावर काळाने घाला घातला. दुचाकीवरून जाताना उभ्या ट्रकला धडकून बापलेकाचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव- धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ घडली. तर या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

accident jpg webp

कळमडू (ता. चाळीसगाव) येथे सालदार म्हणून काम करणारा मोतीराम पावरा (वय ४५) हे पत्नी, मुलगा व मुलीसह शेतातच वास्तव्यास आहेत. ते मध्य प्रदेशातील सेंधवा येथील मूळ रहिवाशी आहेत. ते पत्नी व मुलांना घेऊन बाजारात गेले होते. खरेदी झाल्यानंतर दुचाकीने आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी धडकली. यात मोतीराम पावरा, त्यांचा मुलगा विकी पावरा (वय १०) हे दोघे जागीच ठार झाले.

दुचाकीवर असलेली मोतीराम यांची पत्नी रायाबाई पावरा (वय ४०) गंभीररीत्या जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावून जखमी महिलेला धुळे येथे रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी येथील सहाय्यक निरीक्षक प्रवीण दातरे यांच्यासह भूषण बाविस्कर, राकेश काळे यांनी जाऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातातील मृत मोतीराम पावरा सेंधवा (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now