तरसोद येथील शेकडो युवकांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

सप्टेंबर 19, 2024 4:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२४ । राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री, पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर व नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ग्रामीण मधील तरसोद येथील शेकडो युवकांनी शिव बंधन बांधून आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मोठा जल्लोष करण्यात आला.

Tarsod youth join shivsena
New Project 8

यांनी घेतला हाती भगवा
यावेळी प्रवेश करणाऱ्या मध्ये संतोष रमेश देवरे, निलेश शांताराम ठाकरे, तुषार शामराव काळे, विशाल देवरे, ज्ञानेश्वर बरहाटे, लोकेश शिंदे, सचिन शिंदे, महेश देवरे, रोशन राजपूत, सागर राजपूत, प्रकाश राजपूत, सतीश काळे, लोकेश चौधरी, प्रकाश पाटील , तुषार खंबायत यांनी पालकमंत्र्यांचे हस्ते तसेच तरुणांचे गळ्यातील ताईत जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्की दादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. यावेळी जय भवानी जय शिवराय व शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा जय – जयकार करण्यात आला.

New Project 9

उपस्थित मध्ये युवाउद्योजक युवानेते विक्रम गुलाबराव पाटील, प्रकाश धनगर, सागर पाटील, आबा माळी, राजू धनगर, कैलास इंगळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now