जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सध्या उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळणे कठीण झाले आहे. नोकरी मिळविण्यासाठी तरुण-तरुणी अहोरात्र मेहनत घेत आहे. तुम्हीही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. भारतीय आयकर विभागात सध्या भरती सुरु आहे. ग्रूप सी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. २२ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. विशेष म्हणजेच दहावी पास असलेल्या उमेदवारांना नोकरीची ही मोठी संधी आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. एकूण २५ रिक्त जागांसाठी ही भरती होईल.
कॅन्टीन अटेंडंट पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. १० वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. १८ ते २५ वयोगटातील उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतात. कॅन्टीन अटेंडंट पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.
तमिळनाडू आणि पुद्दुचेरी प्रदेश या ठिकाणी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रधान मुख्य आयकर आयुक्त, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या ठिकाणी त्यांना पोस्ट केले जाऊ शकते.
या भरतीबाबत सर्व माहिती https://tnincometax.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना १८००० ते ५६९०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. ()