जळगाव हादरले! पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर बापाने केला अत्याचार

सप्टेंबर 15, 2024 5:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२४ । राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नसून अशातच जळगाव जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. एरंडोल तालुक्यात वडिलांनीच स्वत:च्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली. पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर नराधम बापानेच अत्याचार केल्याचं समोर आलंय.

crime 18 jpg webp

ही घटना एरंडेल तालुक्यामध्ये घडलेली आहे. याप्रकरणी नराधम बापास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एरंडोल तालुक्यातील एका गावामध्ये हे कुटुंब राहते. या कुटुंबामध्ये ११ आणि १३ वर्षाच्या दोन मुली आहेत. १० आणि ११ रोजी या नराधम बापाने पोटच्या मुलींवर दोन वेळेस अत्याचार केल्याचं समोर आलंय. घरात कुणाला सांगितलं तर मारून टाकेन, असं धमकावत त्याने मुलींनाच आपल्या वासनेचं शिकार बनवलं आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या तक्रारीची वरिष्ठांकडून देखील गंभीर दखल घेण्यात आली. घटनेनंतर मात्र पीडित मुली पूर्णत: हादरून गेल्या आहेत. आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now