लग्नाचे आमिष देऊन भुसावळच्या महिलेवर अत्याचार ; संशयित पसार

सप्टेंबर 13, 2024 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२४ । सध्या अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यात लग्नाचे आमिष देऊन महिलांसह मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना देखील सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना भुसावळ तालुक्यातून समोर आलीय. लग्नाचे आमिष देत भुसावळ तालुक्यातील ३८ वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला.

rape jpg webp

आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी व मारहाण करण्यात आली. पीडितेच्या तक्रारीवरून दीपनगर प्रकल्पातील एका विभागातील अभियंत्यावर भुसावळ तालुका पोलिसांत अत्याचार व अॅट्रासिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल

पीडितेच्या तक्रारीनुसार संशयित हार्दिक हेमचंद्र सोनी (दीपनगर, ता. भुसावळ) याने ५ डिसेंबर २०२१ ते ६ जून २०२४ या कालावधीत लग्न करण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केला. पीडितेचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केली. त्रास असह्य झाल्याने पीडितेने भुसावळ तालुका पोलिसांत हार्दिक सोनी याच्या विरोधात तक्रार दिली. संशयित पसार असून त्याचा शोध सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now